Nilesh Rane । निलेश राणे यांना मोठा धक्का! पुण्यातील डेक्कन परिसरातील मालमत्ता सील

Nilesh Rane

Nilesh Rane । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते निलेश राणे यांची मालमत्ता पुणे महापालिकेने सील केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे निलेश राणे यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. पुणे महापालिकेने मालमत्ता कर न भरल्याने निलेश राणे यांची मालमत्ता सील केली आहे.

Jarange Patil । जरांगे पाटील यांनी केला सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, “मला कधीही अटक…”

पुणे महापालिकेतून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांची तब्बल 3 कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. ही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील डेक्कन भागात राणे यांची मालमत्ता आहे. डेक्कन या ठिकाणी असलेल्या व्यावसायिक जागेचा कर निलेश राणे यांनी न भरल्यामुळे संबंधित मालमत्ता महापालिकेने सील केली आहे.

Eknath Shinde । जरांगेंनी सरकारविरोधात घेतलेल्या भूमिकेमागे कोण? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच धक्कादायक विधान

सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात आहे. निलेश राणेंच्या मालमत्ता थकबाकी प्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आजच कारवाई केली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये अनेक जणांनी मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे जर निर्धारित वेळेत करणे भरला नाही भरला तर थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील महापालिकेने आजच्या कृतीतून दाखवली आहे.

Maharashtra Politics । बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंचा शिंदेंना मोठा धक्का! ‘तो’ खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर?

Spread the love