Politics News । मोठी बातमी! भाजपचे १५ आमदार तडकाफडकी निलंबित

Bjp

Politics News । सध्या हिमाचल प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह १५ आमदारांना निलंबित केले आहे. राज्यात सध्या प्रचंड राजकीय पेच सुरू आहे. काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. हिमाचल प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्यानंतर या संपूर्ण घटनेला सुरुवात झाली.

Jarange Patil । जरांगे पाटील यांनी केला सर्वात खळबळजनक दावा; म्हणाले, “मला कधीही अटक…”

हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 15 आमदारांना निलंबित केले आणि त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब केले. सभागृहात गैरवर्तन आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरून भाजप आमदारांना निलंबित करण्यात आले.

Maharashtra Politics । बिग ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंचा शिंदेंना मोठा धक्का! ‘तो’ खासदार पुन्हा परतीच्या मार्गावर?

भाजपच्या 15 आमदारांमध्ये विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, विपिन सिंग परमार, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, सुरेंद्र शोरी, दीप राज, पूरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप यांचा समावेश आहे. ठाकूर आणि इंदर सिंग गांधी यांची विधानसभेच्या अध्यक्षांनी आज सभापतींच्या दालनात घोषणाबाजी आणि गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून हकालपट्टी केली आहे.

Praful Patel । ब्रेकिंग! अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल यांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा

Spread the love