Satara Lok Sabha । उदयनराजेंना सर्वात मोठा धक्का? बड्या नेत्याने व्यक्त केली सातारा लोकसभा लढण्याची इच्छा

Satara Lok Sabha

Satara Lok Sabha । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha 2024) रणधुमाळी सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. काही जागांवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु आहे. काही जागांवरचा तिढा अजूनही सुटला नाही. अशातच खासदार उदयनराजेंना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण बड्या नेत्याने सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Latest marathi news)

Gas Cylinder Blast । क्षणात झालं होत्याच नव्हतं! सलग पाच गॅस सिलेंडरचे ब्लास्ट, कर्मचाऱ्यांच्या झोपड्या जाळून खाक

महायुतीच्या कऱ्हाडमधील मेळाव्यात आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी थेट उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या समोरच सातारा लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करत दिल्लीत आमचे कोणीही नाही. पण आम्ही मुंबईत सागर बंगल्यावर जातो असे विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सातारा लोकसभेची चर्चा सुरु आहे.

Ambadas Danve । ‘संदिपान भुमरेंना उमेदवारी दिली तर…’ अंबादास दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

जर नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी मिळाली तर त्यामुळे उदयनराजे भोसले यांना धक्का बसू शकतो. महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले, आण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुरुषोत्तम जाधव अन्य काही जणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. असे असताना नरेंद्र पाटील यांच्या मागणीमुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Sanjay Raut । खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत सूत्रधार! बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

Spread the love