Gas Cylinder Blast । क्षणात झालं होत्याच नव्हतं! सलग पाच गॅस सिलेंडरचे ब्लास्ट, कर्मचाऱ्यांच्या झोपड्या जाळून खाक

Gas Cylinder Blast

Gas Cylinder Blast । सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सिलेंडरच्या स्फोटाने (Cylinder Blast) मिरारोड चांगलेच हादरले आहे. मिरारोड येथे एकामागून एक पाच गॅस सिलेंडर ब्लास्ट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण घटनेत कामगारांच्या झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. (Cylinder Blast in Mira Road)

Ambadas Danve । ‘संदिपान भुमरेंना उमेदवारी दिली तर…’ अंबादास दानवेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोड पूर्व रामदेव पार्क येथे के. डी. एम्पायर बिल्डिंग शेजारी पार्क येथे सालासर ग्रुपच्या इमारतीचे नवीन बांधकाम सुरु असून येथे कामगारांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्याच झोपडीमध्ये एका मागोमाग एक अशा पाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेमुळे काही क्षणातच झोपड्यांना आग लागली. आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. (Latest marathi news)

Sanjay Raut । खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊत सूत्रधार! बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आगीमुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी तातडीने घटनास्थळी अग्नीशामक दलाचे पाच बंब दाखल झाले. कामगारांचे काही सामान वाचवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आले आहे.

Pushpa 2 Teaser । पायात घुंगरू, डोळ्यात आग अन् उधळला गुलाल; ‘पुष्पा 2’चा धमाकेदार टीझर झाला रिलीज

Spread the love