
Narayan Rane । राज्याचे मंत्री नितेश राणे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. “भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे,” या त्यांच्या विधानावर आता घरातूनच जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि नितेश राणेंचे वडील नारायण राणे यांनीच आपल्या मुलाला जाहीरपणे कान टोचले आहेत.
Sonam Raghuvanshi Case । हनीमूनच्या नावाखाली घात: नवविवाहितेचा कट उघड – मेघालयात नवऱ्याचा खून
धाराशिव येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या नारायण राणेंनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, “मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, तो जनतेचा सेवक असतो.” त्यांनी नितेश यांच्या विधानामुळे निर्माण झालेला वाद शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी आपल्या नाराजीचाही स्पष्ट उच्चार केला.
नारायण राणेंनी निधी वाटपावरून नितेश राणेंनी केलेल्या टीकेवरही भूमिका स्पष्ट केली. “कोणाचा निधी अडवणं चुकीचं आहे, मी याबाबत स्वतः सूचना देणार आहे,” असं सांगून त्यांनी पक्षांतर्गत समन्वय राखण्याचा सल्ला दिला.
Bacchu Kadu । बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तिव्र; प्रकृती चिंताजनक, राज्यभरात राजकीय हालचालींना वेग
या संवादादरम्यान मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. “महाजन मानसिक असंतुलनात आहेत. मी दिल्लीला असतो आणि ते क्रांती चौकात उभे असतात, माझी त्यांच्याशी तुलना नको,” असा टोला त्यांनी लगावला.
या संपूर्ण घडामोडींवर ठाकरे गटानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाण्यात “मी फडणवीस यांचा बाप मानत नाही” अशा आशयाचा बॅनर झळकवण्यात आला, जो काही वेळातच महानगरपालिकेने हटवला.