Narayan Rane । काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. त्यांनतर आता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने (Ashok Chavan) संपूर्ण समीरकरणे बदलली आहेत.
Mallika Rajput Death । ब्रेकिंग! मनोरंजन विश्वात मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू
भाजप अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवणार आहे. त्यामुळे नारायण राणे आणि पियूष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, नारायण राणे यंदा लोकसभा निवडणुक लढवतील ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात शड्डू ठोकतील.
Devendra Fadnavis । विरोधी पक्षातील नेते भाजपमध्ये कसे येतात? फडणवीसांनी सांगितली माहिती
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या पट्ट्यात विनायक राऊत यांची मोठी ताकत आहे. गेली दोन टर्म विनायक राऊत मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांना शह देण्यासाठी नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या नेत्याला लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे.