
Namdev Jadhav । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांना काळ फासल्याची माहिती समोर आली आहे. हा सर्व प्रकार पुण्याच्या पत्रकार भवन येथे घडला आहे. नामदेव जाधव प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळ फासलं.
नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली होती. शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या विरोधात वक्तव्य केले होते. त्यामुळेच या रागातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात (Pune) काळ फासलं आहे.
Car Accident । लग्नसमारंभावरून परतताना काळाने घातला घाला, कार झाडाला धडकल्याने ५ जणांचा मृत्यू
“आमच्या विरोधात कारवाई व्हायची ती होऊ द्या, मात्र शरद पवार यांच्या विषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही.” अशी प्रतिक्रिया एका आक्रमक कार्यकर्त्यांने दिली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या बद्दल अपशब्द बोलणाऱ्या नामदेव जाधव यांना पुण्याच्या पत्रकार भावना जवळ काळं फासण्यात आलं आहे”, अशी देखील प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली आहे.