Vijay Shivtare । चिन्ह कमळ का असेना, पण बारामतीतूनच लढणार, विजय शिवतारेंमुळे वाढले अजितदादांचे टेन्शन

Vijay Shivtare

Vijay Shivtare । लोकसभा निवडणुका (Loksabha election 2024) होण्यापूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घटना पाहायला मिळत आहे. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष बारामती मतदारसंघाकडे लागले आहे. कारण या मतदारसंघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे (Sunetra Pawar Vs Supriya Sule) असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. असे असताना आता शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंमुळे अजित पवारांचे टेन्शन वाढवले आहे. (Latest marathi news)

Sanjay Raut । संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ! दाखल झाली निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमकं प्रकारण काय?

विजय शिवतारे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी बारामतीतून निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “मागील मी 15-20 दिवस बारामती मतदारसंघातून फिरत असून माझा आत्मविश्वास आला आहे. ही जागा गेल्या 10-20 वर्षापासून भाजपची (BJP) होती. जरी वेळी पडली तरी भाजपच्या चिन्हावर मी निवडणूक लढवू शकतो,” असे विजय शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar । अजित पवारांकडं गेलेले अनेक जण आपल्याकडं येणार, शरद पवारांचा मोठा दावा

मी एकनाथ शिंदे यांना भेटलो. कालच शंभूराजे देसाईंना भेटलो. त्यांनाही मी बारामतीची सीट महायुतीमध्ये आपल्यासाठी मागून घ्यावी, अशी विनंती केली आहे. या मतदारसंघातून सुनेत्रा पवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार नाहीत. याचा सुप्रिया सुळे यांना फायदा होऊ शकतो. अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात ठिकठिकाणी आपले शत्रू तयार केले आहेत,” असाही दावा शिवतारेंनी केला आहे.

BJP । भाजपचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! बडा नेता करणार पक्षात प्रवेश

Spread the love