Mumbai Hoarding Collapse । मुंबईतील घाटकोपर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. मोठे होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला तर 74 जण जखमी झाले. त्याचवेळी होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजपा आणि महाविकास आघाडीचे नेते आपसात भांडत असल्याच चित्र दिसत आहे. भाजपा नेते किरीट सोम्मय्या, मिहिर कोटेचा आणि पराग शहा घटनास्थळी होते. त्याचवेळी महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
Unseasonal Rain | पावसाचं रौद्ररुप! धक्कादायक व्हिडीओ समोर
महाविकास आघाडीचे नेते संजय दीना पाटील यांनी किरीट सोमय्यांवर आक्षेप घेतला. किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्याने संजय दीना पाटील चांगलेच भडकले. “भाजपचे नेते बचाव कार्यात अडथळे आणत आहेत. किरीट सोमय्यांमुळे बचाव कार्य काही काळ थांबवून ठेवलं होतं” असा आरोप संजय दीना पाटील यांनी केला आहे.
Highway Accident । भीषण अपघात, भरधाव वेगात असलेल्या कारची डिव्हायडर तोडून ट्रकला धडक, 6 जण जागीच ठार
दरम्यान, राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपति जगदीप धनखर यांनी घाटकोपर, मुंबई येथे झालेल्या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांप्रती शोक व्यक्त केला आणि होर्डिंग पडून जखमी झालेल्या लोकांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
Pune News । ब्रेकिंग! पुण्यात 7 ठिकाणी बॉम्बस्फोट होणार…त्या कॉलने उडाली सगळीकडे खळबळ