Mumbai Fire Video । ब्रेकिंग न्यूज! शाळेला भीषण आग; सगळीकडे धावपळ सुरु

Mumbai Fire

Mumbai Fire Video । मुंबईतील परळ भागात असलेल्या महापालिकेच्या शाळेत सोमवारी सकाळी आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळे शाळा बंद असल्याने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मिंट कॉलनी मोनोरेल स्थानकासमोरील पाच मजली साईबाबा शाळेत सकाळी ९.१५ च्या सुमारास आग लागली.

Veena Malik । ‘या’ क्रिकेटरकडून प्रसिद्ध अभिनेत्री करुन घ्यायची मसाज; वाचून तुम्हीही व्हाल थक्क

अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि इतर अग्निशमन गाड्या तात्काळ शाळेत पोहोचल्या आणि 20 मिनिटांत आग आटोक्यात आणली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तळमजल्यावर गाद्या ठेवलेल्या स्टोअर रुममध्ये आग लागल्याचे त्यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण लगेच कळू शकले नाही, परंतु परिसरातील काही रहिवाशांनी शाळेच्या इमारतीमध्ये गॅस सिलिंडरचे अनेक स्फोट ऐकल्याचा दावा केला. आगीमुळे काळ्या धुराचे दाट ढग परिसरात दूरवरून दिसत होते.

Deepika Padukone । मोठी बातमी! अभिनेत्री दीपिका पादुकोणची तब्येत बिघडली; चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

आयएएनएसनुसार, बीएमसी आपत्ती सेलच्या अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. उंच इमारतींनी वेढलेल्या पाच मजली साईबाबा शाळेच्या स्टोअर रूममधून दाट काळा धूर निघू लागल्याने ही आग लागली. यानंतर परिसरात घबराट पसरली. माहितीनुसार, स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या काही गाद्यांना आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे,

Maharashtra Politics । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

Spread the love