Maharashtra Politics । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी! राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव

Rahul Narvekar

Maharashtra Politics । शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे राजकारण चांगले ढवळून निघाले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर शिंदे गटामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे ठाकरे गट आता चांगलाच आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Viral Video । दिल्ली विमानतळावर फ्लाईटला उशीर झाल्याने प्रवाशी संतापला, पायलटला केली मारहाण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

आमदार अपात्रतेच्या निकाला विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाविरोधात निकाल दिला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून होत आहे. त्यामुळेच आता ठाकरे गटाने याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याची माहिती मिळत आहे. (Shivsena MLA Disqualification Case)

Amit Shah । ब्रेकिंग! अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे निधन, भाजप नेत्याचे सर्व कार्यक्रम रद्द

यासंदर्भात ठाकरे गटाने आज आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात ऑनलाईन याचिका देखील दाखल केली आहे. अध्यक्षांनी दिलेल्या निकालामुळे सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला असल्याचे ठाकरे गटाने या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Accident News । ब्रेकिंग! अतिशय भीषण अपघात; दोन कार समोरासमोर धडकल्या; ६ जण जागीच ठार; अपघाताचा व्हिडीओ पाहून धक्का बसेल

Spread the love