Hingoli Earthquake । ब्रेकिंग न्यूज! हिंगोली जिल्ह्यामध्ये २० ते २५ गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

Hingoli Earthquake

Hingoli Earthquake । हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (१९ नोव्हेंबर) रात्री जिल्ह्यातील तब्बल २० गावांमध्ये जमीन हादरली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल इतकी होती. (Hingoli Earthquake)

Uttarakhand । 170 तास उलटूनही उत्तराखंडच्या बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यास अपयश , बचावासाठी आणखी 4-5 दिवस लागणार?

माहितीनुसार, रविवारी रात्री औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, येडुत, धामणी, वसई त्याचबरोबर वसमत तालुक्यातील, कुपटी, पांगरा शिंदे , वापटी, कुरुंदासह जवळपास २० गावांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. यामुळे काही काळ या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले. भूगर्भातून गुढ आवाज आला अन् अचानक जमीन हादरली. भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली.

Eknath Shinde । मोठी बातमी! ओबीसी मुलींना 100% फी माफी? शिंदे सरकारचा मोठा निर्णय

यामध्ये काही घरांमधील वस्तूंची पडझड झाली. त्यामुळे अनेकांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली. या भूकंपाची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने पोलीस व महसूल पथक या गावांमध्ये पाठवले.

मोलगीत दातांचा दवाखान्याचे उद्घाटन, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न

Spread the love