Mohan Bhagwat । पुणे : नुकताच पुण्यात अभिजीत जोग लिखित “जगाला पोखरणारी डावी वाळवी” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हजेरी लावली होती. पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भागवत यांनी डाव्यांवर (Left Parties) चांगलाच निशाणा (Mohan Bhagwat Statement) साधला आहे. त्याला आता डावे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. (Latets Marathi News)
Credit Card । क्रेडिट कार्डचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कमवता येणार अतिरिक्त पैसे
“खरंतर डाव्या लोकांना अहंकार आणि आपल्या दृष्ट प्रवृत्तीचा खूप अभिमान असतो. जरी त्यांच्याकडे पैसे कमी असले तरी ते त्यांचा विचार वाढवत आहे. तो पसरत देखील आहे. नेमके आपण तिथे कमी पडत आहोत. आपल्याबाबत त्यांनी एक भ्रम तयार केला आहे, तो आपणच दूर केला पाहिजे”, असे आवाहन मोहन भागवत यांनी केलं आहे.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “गुजरातच्या एका शाळेत गेल्यावर मला एका शिक्षकाने एक नियम दाखवला होता. केजी-2 चे मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टची माहिती आहे का? याची माहिती सांगणारा हा नियम होता. त्यावरून डाव्यांचा विचार कुठे पोहोचला आहे, हे समजते. हा डाव्यांच्या विचारांचा परिणाम आहे. ट्रम्प नंतर आलेल्या सरकारने नवीन नियम आणला. त्यात विद्यार्थ्यांशी जेंडरच्या बाबत चर्चा करू नये, असा आदेश दिला होता”, असे भागवत यांनी स्पष्ट केले.
Maratha reservation । आंदोलन तापले! आरक्षण मिळत नसल्याने तरुणाने घेतला टोकाचा निर्णय