MLA Disqualified | मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट

Mla Disqualified

MLA Disqualified | शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा मागच्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे. या प्रकरणावर अद्यापही कोणती सुनावणी झाली नाही. मात्र आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढच्या आठवड्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस देखील बजावण्यास सुरुवात झाली आहे. (MLA Disqualified)

Mumbai Local । धक्कादायक! लोकल ट्रेनमध्ये तरुणाचा जीवघेणा स्टंट, प्लॅटफॉर्म येण्यापूर्वीच मारली उडी आणि..

या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या (Shivsena) 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना या प्रकरणासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. अशी विधिमंडळाच्या सूत्रांनी माहिती दिली आहे. याबाबत होणारी सुनावणी ही विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे.

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला ऑरेंज अलर्ट

या सुनावणी वेळी शिवसेनेच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांकडून त्यांचे मत मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. यावेळी या आमदारांना त्यांचे काही पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना ते पुरावे सादर करता येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता याबाबत काही निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ST Employees । एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी झाली वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

Spread the love