ST Employees । एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ‘इतक्या’ टक्क्यांनी झाली वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

ST Employees । एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांनी झाली वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा

ST Employees । सध्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये देखील वाढ केलेली माहिती समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता देखील दिली आहे. (ST Employees)

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवारांना बालेकिल्ल्यातच बसणार मोठा धक्का? बडा नेता अजित पवारांच्या भेटीला

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्याने या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील जवळपास 90 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर महागाई भत्त्यामध्ये (Dearness allowance) 4 टक्क्यांची वाढ झाल्याने सरकारवर 9 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

Biopic On Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर येणार चित्रपट; शूटिंगची तारीखही झाली फिक्स

ज्याप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळतो त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील मिळावा असा प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी केल्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Mumbai Rain । मोठी बातमी! मुंबईमध्ये पडतोय मुसळधार पाऊस; वाहतुकीसाठी अंधेरी सबवे बंद

Spread the love