संपूर्ण राज्याला हादरून सोडणाऱ्या सरस्वती वैद्य (Saraswati Vaidya) हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहेत. मनोज सानेने (Manoj Sane) सरस्वतीच्या शरीराचे तुकडे केले. शरीराच्या तुकड्यांचे दुर्गंधी येऊ नये. तसेच मृतदेहाची सहज विल्हेवाट लावता यावी. यासाठी त्याने स्वयंपाक घरात काही तुकडे तळले. काही तुकडे पाण्यात उकळले, असे अनेक नवीन खुलासे तपासातून पुढे येत आहेत.
Arjun Tendulkar । सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी समोर आली मोठी गूडन्युज!
मनोज साने याने सरस्वती वैद्यची हत्या केली नाही. तिने आत्महत्या (suicide) केली आहे, असा दावा केला. या हत्येच्या प्रकरणात अडकू नये. यासाठी शरीराचे तुकडे करून उकळले आणि तळले असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण तपासासाठी अधिकच गुंतागुंतीचे जाऊ लागले आहे. मनोज साने याने सरस्वती वैद्य यांच्या शरीराची तुकडे अर्धवट उकळले. तसेच अर्धवट भाजले. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ञांनी दिलेल्या जवाबनुसार तिने आत्महत्या केली का ? तिची हत्या करण्यात आली, हे शोधणे अवघड जाऊ लागले आहे. जर तपास यंत्रणा खून सिद्ध करण्यास अपयशी ठरली. तर मनोज सानेला कमी वर्षाची शिक्षा होऊ शकते.
शिकण्याचं स्वप्न अधुरीच राहील..! लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थीनीची चाकूने हत्या
वकिलाच्या म्हणण्यानुसार, पोलीस खून सिद्ध करण्यास अपयशी ठरले. तर मनोज साने याला भारतीय दंड संहिता कलम २०१ नुसार पुरावे नष्ट करणे आणि गुन्हेगाराला खोटी माहिती देणे आणि कलम ३०६ नुसार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे. या दोन कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. शिक्षेच्या या दोन्ही कलमानुसार केवळ २ ते ५ वर्षाची शिक्षा आहे.