
Maratha Reservation । मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जंगी सभा घेत आहेत. या सभेमध्ये मराठ्यांना एकत्र येऊन लढण्याचे आव्हान देखील मनोज जरांगे पाटील करत आहेत
Baramti Plane Accident । धक्कादायक बातमी! बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक जखमी
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेट देखील दिला आहे. मात्र दुसरीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजातील लोकांच्या आत्महत्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेड मधील अजून एका तरुणाने आरक्षणासाठी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. माझं बलिदान वाया जाऊ देऊ नका अशी चिठ्ठी लिहीत या तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का! कट्टर शिवसैनिक करणार शिंदे गटात प्रवेश?
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात ही घटना घडली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे. शुभम पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.