Pune Crime । धक्कादायक! IT इंजिनिअर महिलेचा गोळ्या झाडून खून, लॉजमध्ये सापडला मृतदेह

Pune Crime

Pune Crime । हिंजवडीत आयटी हबमध्ये (Hinjewadi IT Hub) एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या (Crime in Hinjewadi IT Hub) करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा मृतदेह एका लॉजमध्ये सापडला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला मागील दोन दिवसांपासून लॉज मध्ये वास्तव्यास होती, अशी प्राथमिक माहिती आहे. (Latest marathi news)

Narayan Rane । नारायण राणेंचा अध्यादेशाला कडाडून विरोध, म्हणाले; “राज्य सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही”

याप्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्याने प्रेम संबंधांतून आपण ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या महारुंजी भागातील सुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये ही घटना घडली आहे. लखनऊ वरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. हत्या करून तो मुंबईला पळून गेला.

Supriya Sule । “अध्यादेश काढण्यासाठी सरकारने वेळकाढूपणा केला”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर घणाघात

पण मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी त्याला पिस्टलसह अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचे समोर आले आहे. पण हिंजवडीत आयटी हबमध्ये एका आयटी इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

Chhagan Bhujbal । छगन भुजबळांचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले; “सरकार खोटं बोलत आहे”

Spread the love