Maratha Reservation । “दुसऱ्याच्या ताटातून मराठा समाजाला आरक्षण नको, सर्वपक्षीय बैठकीत असं ठरलेलं”, शरद पवार स्पष्ट बोलले

Maratha Reservation

Maratha Reservation । मागील काही दिवसांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा मराठ्यांनी घेतला आहे. आरक्षणावरून राज्याचे राजकारण देखील बदलले आहे. ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जुंपली आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय घडलं, याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

Crime News । धक्कादायक! शिपायाने अल्पवयीन मुलीवर केला वारंवार बलात्कार, गर्भवती केलं अन्…

शरद पवार म्हणाले की, “मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बौलावली होती. मीदेखील त्या बैठकीला गेलो होतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु हे करत असतांना दुसऱ्याच्या ताटातून आरक्षण काढून घेतलं नाही पाहिजे. याबाबत केंद्र सराकरने (Central Govt) निर्णय घ्यावा, तसाच ठराव आम्ही बैठकीत घेतला होता.”

TMKOC । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा बॉयकॉट करा,’ चाहत्यांची संतप्त मागणी; नेमकं कारण काय?

राज्यात सध्या मराठा समाज आणि ओबीसी (OBC) समाजामध्ये वाद सुरु आहे, त्यावरुन शरद पवारांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे. “दोन समाजात तेढ निर्माण करण्यात भाजपचा हात आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवून इतर कोणालाही धक्का न लावता स्वतंत्रपणे आरक्षण देता येईल”, असे शरद पवार म्हणाले आहेत.

Mumbai Fire । इमारतीला भीषण आग! होरपळून दोघांचा मृत्यू तर ९ जणांना वाचवण्यात यश

Spread the love