Manoj Jarange । सध्या राज्यभर कुणबी नोंदी (Kunbi records) शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकार ॲक्शन मोडवर आल्याचे आपल्याला दिसत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या कुटुंबात एकही कुणबीची नोंद आढळली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे सगळीकडे याची चर्चा सुरू आहे.
Viral Video । विद्यार्थ्यासोबतच्या ‘त्या’ रोमँटिक फोटोशूटवर शिक्षिकेन दिल उत्तर, म्हणाली…
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या घरीच नाही तर ज्या ठिकाणाहून आंदोलनाची सुरुवात झाली त्याच अंतरवाली सराटी या गावात एकही कुणबीची नोंद न्यायमूर्ती शिंदे समितीला आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील, त्यांचे कुटुंबीय आणि आंतरवाली सराटीचे गावकरी आरक्षणापासून वंचित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी मनोज जरांगे हे मागच्या चार महिन्यापासून आंदोलन करत आहेत. मात्र ज्या ठिकाणाहून आंदोलनाची सुरुवात झाली त्याच ठिकाणी एकही कुणबी नोंद सापडली नाही त्यामुळे आरक्षण मिळेल का नाही? यावर सध्या चर्चा सुरू आहे.