Assam Accident News । पिकनिकला जाताना काळाने घातला घाला, बस आणि ट्रकचा भीषण अपघात; १२ जण जागीच ठार तर २५ जखमी

Accident News

Assam Accident News । आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील डेरगाव परिसरात आज (३ जानेवारी) सकाळी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर 25 हून अधिक जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. गोलाघाटचे एसपी राजेन सिंह यांनी माहिती दिली की, गोलाघाटच्या डेरगावजवळील बलिजन परिसरात पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. ( Accident News)

Nashik Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई-आग्रा महामार्गावर थरार; प्रवाशांसोबत घडलं भयानक

माहितीनुसार, बसमध्ये एकूण 45 प्रवासी प्रवास करत होते. ही बस गोलाघाटमधील कामरगाव येथून तिनसुकिया जिल्ह्यातील तिलिंगा मंदिराकडे पिकनिकसाठी जात असताना पहाटे साडेचारच्या सुमारास रस्त्यात एका ट्रकला धडकली. जोरहाट दिशेकडून ट्रक चुकीच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे मोठा अपघात झाला आहे.

Manoj Jarange । मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोर संतापले, नेमकं काय घडलं बैठकीत?

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यानंतर बचावकार्यास सुरवात केली. यानंतर अपघातामधील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांनी पत्रकारांना सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या 25 जणांवर उपचार सुरू आहेत.

Shirdi News । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर १० ते १२ जणांनी केला प्राणघातक हल्ला; अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

Spread the love