Bachchu Kadu । मराठा समाजाला आरक्षण कधी मिळेल? बच्चू कडू यांनी सांगितली आरक्षणाची तारीख

Bachchu Kadu

Bachchu Kadu । मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा प्रलंबित आहे. आरक्षणासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने आरक्षण (Maratha strike) सुरु केले आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी २० जानेवारीपासून बीडमधून पदयात्रेला सुरुवात केली असून ते २६ जानेवारी मुंबईत चक्काजाम आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Latest marathi news)

Crime News । लज्जास्पद! शेजाऱ्याने लहान मुलीला खोलीत बंद करून केली मारहाण, वाचवायला गेलेल्या आईलाही सोडले नाही

दरम्यान, आज त्यांची पदयात्रा शिरूरमध्ये दाखल झाली आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू हे आज आंदोलनात सहभागी होणार आहेत. यापूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला. बोलताना ते म्हणाले की, “जरांगे पाटील यांच्यावर बंदुकीच्या गोळ्यांची भाषा करण्याची वेळ येणार नाही. कारण त्यांची मागणी राज्य सरकारने (State Govt) मान्य केली आहे,” असे बच्चू कडू म्हणाले.

Rohit Pawar । मोठी बातमी! रोहित पवारांची आज ED चौकशी होणार; शरद पवार, सुप्रिया सुळे असणार सोबत

पुढे ते म्हणाले की, “५४ लाख मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्रांपैकी ३९ लाख प्रमाणपत्रं वाटली आहेत. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी राज्यात सर्वेक्षण सुरू झालं असून लवकरच ते सर्वेक्षण पूर्ण होईल. यापैकी काही नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल”, असे देखील बच्चू कडू म्हणाले आहेत.

Nagar-Kalyan Highway Accident । अहमदनगर जिल्ह्यात उसाचा ट्रॅक्टर, बस आणि कारचा भीषण अपघात! ६ जण जागीच ठार, अनेकजण जखमी

Spread the love