Manoj Jarange । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली

Manoj Jarange Patil

Manoj Jarange । मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याची भूमिका घेतमनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मात्र या दरम्यान मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांचा हात थरथरत होता माईकही हातातून खाली पडला. मात्र क्षीण झालेल्या आवाजातही त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. अनेक मराठा बांधवांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

Famous model । मोठी बातमी! प्रसिद्ध मॉडेलचा फ्रिजमध्ये भयानक अवस्थेत आढळला मृतदेह, सर्वत्र उडाली खळबळ

त्याचबरोबर सध्या अनेक तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या देखील केल्या आहेत. या तरुणांना देखील मनोज जरांगे पाटील यांनी एक आव्हान केले आहे. मराठा समाजातील तरुणांनी आपल्या गावात आमरण उपोषण सुरू केलं असेल तर पोलीस ठाण्यात माहिती अर्ज द्या आत्महत्या करू नका असं आवाहन करत आपल्यातील एकजुटीत फूट पडू देऊ नका असे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Animal Diet | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुभत्या जनावरांसाठी आयव्हीआरआयने बनविले विशेष खाद्य; दुधात होणार दुपटीने वाढ

त्याचबरोबर यावेळी त्यांनी सरकारला एक गंभीर इशारा देखील दिला आहे. अजून तीन दिवस आम्ही सरकारची वाट पाहणार आहोत. जर सरकारला माणुसकी समजत नसेल तर आमची ताकद त्यांना दाखवू असा गंभीर इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे येत्या काळात मनोज जरांगे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Voter ID | आता घरच्याघरी ऑनलाइन पद्धतीने मतदान ओळखपत्र बनवा! जाणून घ्या प्रक्रिया

Spread the love