Famous model । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका येथील एका प्रसिद्ध मॉडेल (Famous model) सोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मॉडेलचा मृतदेह फ्रिजमध्ये अत्यंत भयानक अवस्थेत आढळल्याची माहिती समोर आली आहे. या मॉडेलचे नाव नसून मलीसा मूनी आहे. मीडिया रिपोर्टनुसार मलीसा गरोदर होती. लॉस एंजेलिस या ठिकाणी राहत असून मृत्यूनंतर तिचे हात पाय घट्ट बांधून तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवण्यात आला होता. (Latest Marathi News)
Sharad Pawar । शरद पवारांना धक्का! 8 आमदारांना विधीमंडळाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
इतकंच नाहीतर मृत्यूपूर्वी मलीसा हिला हाणमार करण्यात आल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिश हिचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी देण्यात आला होता. यावेळी मॉडेल हिच्यासोबत हिंसा झाल्याचे देखील रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. शिवविच्छेदन रिपोर्टनुसार, मलिसाच्या शरीरावर एकदम जड वस्तू आणि हल्ला करण्यात आला होता. त्याचबरोबर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोल (Alcohol) आणि कोकेणचे (Koken) काही अंशही सापडले होते.
या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मॉडेलच्या मृत्यूप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. संबंधित प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यामुळे आता पोलीस तपासामध्ये पुढे काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.