Manoj Jarange। मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला हात जोडून केली ‘ही’ विनंती; म्हणाले, तुम्ही जर…”

Manoj Jarange joined hands with the Maratha community and made this request

Manoj Jarange । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला चर्चेत आला आहे. आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालन्यामध्ये मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सध्या आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. हे उपोषण सुरू असतात राज्याच्या विविध ठिकाणी आंदोलन देखील होत आहेत. अशातच मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर सगळीकडे खळबळ उडाली आहे. (Maratha Aarakshan News)

Maharastra Rain । पाऊस नसल्यामुळे पीक वाया गेले, बापाने घेतलेले कर्ज कसे फेडायचं लेकासमोर प्रश्न; विषारी इंजेक्शन टोचून केली आत्महत्या

या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले महाराष्ट्रातील मराठा समाजाला मी आवाहन करतो की, या आंदोलनाला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपल्याला यश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलने करावीत, पाठिंबा द्याव्यात मात्र कुठेही गालबोट लागेल असं आंदोलन कोणीही करू नये असे मी हात जोडून आवाहन करतो.

Petrol Diesel Rate । सर्वसामान्यांना केंद्राकडून मिळणार मोठं गिफ्ट, पेट्रोल-डिझेलच्या किमती होणार कमी

कोणीही आत्महत्या करू नये – जरांगे पाटील यांचे आव्हान

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपण मराठा आरक्षण सरकारकडे मागत आहोत. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे भविष्यासाठी हे आरक्षण पाहिजे त्यांनीच टोकाचे पाऊल उचलू नये कोणीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू नये. त्याचं कारण आम्ही इथं तुम्हाला न्याय देण्यासाठी आम्ही बसलोय त्यामुळे तुम्ही कोणत्याही टोकाचे पाऊल उचलू नये असे जरांगे म्हणाले आहेत.

Wheat Price । गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ, रचला नवीन रेकॉर्ड; पहा किती मिळतोय भाव?

Spread the love