Manoj Jarange । सध्या मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे सगळीकडे मराठा बांधवांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.
शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील आपले उपोषण सोडणार आहेत. राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या आहेत यामुळे मराठा समाजाला मोठे यश मिळाले असल्याचे मानले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपोषण सोडणार आहेत.
या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
Manoj Jarange । मनोज जरांगेंच्या ‘या’ ७ मागण्या तुम्हाला माहिती आहेत का? वाचा एका क्लिकवर