Majhi Ladki Bahin Yojana । मोबाइलवरून घरबसल्या ‘लाडकी बहीण योजने’साठी करता येतोय अर्ज; जाणून घ्या अर्जप्रक्रिया

Eknath Shinde

Majhi Ladki Bahin Yojana । महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिन योजने’ची राज्यभर चर्चा होत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील. महिलांना या योजनेशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, जसे की आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया इ. तुम्ही देखील अर्ज करणार असाल तर येथे संपूर्ण प्रक्रिया सहज समजून घ्या.

Sangli News । खळबळजनक बातमी! लहान मुलांच्या माध्यान्ह भोजनाच्या पाकिटात मृत साप आढळला

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया

सर्व प्रथम, Google Play Store वर जा आणि ‘नारी शक्ती दूत’ ॲप शोधा आणि ते इंस्टाल करा. या ॲपद्वारे तुम्ही विविध योजनांसाठी अर्ज करू शकता. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. लॉग इन करा तुमचा मोबाईल नंबर, OTP देऊन आणि अटी व शर्तींना सहमती देऊन ॲपवर लॉग इन करा. तुमचे प्रोफाइल अपडेट करा तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, ईमेल आयडी, जिल्हा, तालुका, आणि महिला शक्तीचा प्रकार (सामान्य महिला, बचत गटाच्या अध्यक्षा, गृहिणी, ग्रामसेवक) भरावयाचा आहे.

Majhi Ladki Bahin Yojana । ‘या’ महिला ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करू शकत नाहीत; जाणून घ्या

अँप ओपन झाल्यानंतर ‘नारी शक्ती दूत’ पर्यायावर क्लिक करा आणि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना’ पर्याय निवडा. यानंतर ॲपला लोकेशन परमिशन द्या. यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होईल. तुमच्या आधार कार्डावर असलेली योग्य माहिती भरा. यामध्ये संपूर्ण नाव, जन्मतारीख, पतीचे किंवा वडिलांचे नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिन कोड, आधार कार्ड क्रमांक, आणि तुम्ही इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तपशील भरा.

Sangli News । खळबळजनक बातमी! लहान मुलांच्या माध्यान्ह भोजनाच्या पाकिटात मृत साप आढळला

तुमची वैवाहिक स्थिती प्रविष्ट करा आणि लग्नापूर्वी महिलेचे पूर्ण नाव देखील सांगा. त्यांनतर खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड, तसेच आधार कार्ड नंबर टाका. आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पुष्टीकरण पत्र, बँक पासबुक इत्यादी अपलोड करा. त्यानंतर थेट फोटो घ्या आणि अपलोड करा.

Majhi Ladki Bahin Yojana । ‘या’ महिला ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करू शकत नाहीत; जाणून घ्या

“गॅरंटी डिस्क्लेमर स्वीकारा” वर क्लिक करा आणि अटी व शर्ती स्वीकारा. सर्वकाही पूर्ण झाल्यावर, फॉर्म सबमिट करा. सर्व माहिती आणि कागदपत्रे तपासा, त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. OTP एंटर करा. अशा प्रकारे, तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण करू शकता.

Havaman Andaj । सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, या भागात अलर्ट

Spread the love