Majhi Ladki Bahin Yojana । ‘या’ महिला ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करू शकत नाहीत; जाणून घ्या

Eknath Shinde

Majhi Ladki Bahin Yojana । महाराष्ट्रात प्रत्येक पात्र महिलांना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभ मिळणार आहे. याबाबत कोणतीही शंका बाळगू नये, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले. योजनेची अंतिम तारीख 31 ऑगस्ट असून, जिल्ह्यातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 8 जुलैपासून विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Vasant More । महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ, वसंत मोरे यांनी केला उद्धव ठाकरे गटात प्रवेश

महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’ सुरू झाली असून, त्यामुळे महिलांमध्ये उत्साह आहे. 3 जुलै रोजी सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच प्रत्येक कुटुंबातील एकटी महिला देखील याचा लाभ घेऊ शकतात. (Majhi Ladki Bahin Yojana Last Date)

Team India Victory Parade । टीम इंडियाच्या स्वागतासाठी मारिन ड्राइव्हवर चाहत्यांची तुफान गर्दी!

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी कोण अर्ज करू शकत नाही?

ज्या कुटुंबांकडे ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे तेही या योजनेत सहभागी होऊ शकतात. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा आउटसोर्स, स्वैच्छिक आणि कंत्राटी कर्मचारी देखील पात्र असतील. तथापि, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजनेंतर्गत 1,500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळते त्या या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यांनी या योजनेसाठी अर्ज करू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

Havaman Andaj । सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, या भागात अलर्ट

Spread the love