Mahayuti Government । राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना महायुतीने सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी तयारी केली आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या मेहनतीनंतर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त २५ नोव्हेंबर ठरवण्यात आला आहे. यामध्ये महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी कोण असेल, यावर अंतिम निर्णय होणार आहे.
Devendr Fadanvis । “मी संध्याकाळी येतो…”: देवेंद्र फडणवीसांना अभूतपूर्व यशानंतर कोणी केला पहिला फोन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते एकत्र येऊन बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेणार आहेत. यानंतर, २६ नोव्हेंबरला महायुती सरकारचा शपथविधी होईल, अशी माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar । बारामतीत अजित पवार यांची आमदारपदी निवड, युगेंद्र पवार यांचा पराभव
भाजपने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेतली असून, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत आणि आता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची दाट शक्यता आहे.