Achalpur Assembly Result 2024 | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाल्याचे चित्र दिसत असतानाच अचलपूर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. विशेष म्हणजे, सरकार स्थापनेसाठी तयार असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि परिवर्तन महाशक्तीचे घटक असलेले बच्चू कडू यांना या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला आहे.
अचलपूर मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती, ज्यामध्ये भाजपचे प्रवीण तायडे, काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख आणि बच्चू कडू यांचा सामना होता. यामध्ये भाजपचे प्रवीण तायडे यांनी विजय मिळवला असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे.
बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याशी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच, त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे लढण्याचे आश्वासन दिले होते. “आमच्याशिवाय सरकार बसणार नाही,” असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यामुळे अनेक राजकीय विश्लेषक आश्चर्यचकित झाले आहेत.
Eknath Shinde । महायुतीच्या दणदणीत विजयानंतर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले…