Crime News । महाराष्ट्र हदरला! अत्याचार करून चिमुकलीची हत्या

Maharashtra shook! Torture and murder of a child

Crime News । देशात अजूनही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायदे कडक केले तरीही त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही. गुन्हेगारांना (Criminals) या कायद्याचा कसलाच धाक राहिला नाही. या अत्याचारांमुळे सतत राजकीय वर्तुळ तापलेले पाहायला मिळते. अशीच एक धक्कायदायक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis । गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिली क्लीनचिट; नेमकं प्रकरण काय?

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हे प्रकरण जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) हादरला आहे. ही चिमुकली दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा तपास सुरु होता. तिच्या घरच्यांना गोठ्यात एका ठिकणी दुर्गंधी येत असल्याने पाहिले असता चाऱ्यात मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिसांना एका तरुणावर संशय आला. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. (Maharashtra Crime)

Tomato Price Hike । सर्वसामान्यांना पुन्हा बसणार धक्का? टोमॅटोच्या किमती ३०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

त्यावेळी त्याने अत्याचार केल्यानंतर झालेल्या झटापटीत त्या मुलीच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान या तरुणाला गुन्ह्याच्या तपासासाठी घेऊन जाताना संतप्त ग्रामस्थांनी वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला. पोलिसांनी या चौकशीनंतर त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

Goat Disease । सावधान! शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरतोय हा जीवघेणा आजार

Spread the love