Tomato Price Hike । सर्वसामान्यांना पुन्हा बसणार धक्का? टोमॅटोच्या किमती ३०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता

Will the common people be shocked again? Tomato prices are likely to go up to Rs

Tomato Price Hike । यावर्षी टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा झाला आहे. कारण दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. यंदा टोमॅटोचे दर (Tomato Price) गगनाला भिडले आहेत. दर वाढल्याने (Tomato Rate) शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. परंतु याचा खूप मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. अनेकांच्या ताटातून टोमॅटो गायब झाला आहे. (Latest Marathi News)

Goat Disease । सावधान! शेळी आणि मेंढ्यांमध्ये झपाट्याने पसरतोय हा जीवघेणा आजार

देशातील काही भागात टोमॅटोचे दर २०० रुपयांवर गेले आहेत. अशातच आता लवकरच हे दर ३०० रुपयांपर्यंत जातील, अशी शक्यता सध्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. आवक कमी झाल्याने टोमॅटोचे किरकोळ बाजारात दर वाढण्याची शक्यता आहे. जर हे दर येत्या काळात वाढले तर त्यामुळे सर्वसामान्यांचे पुन्हा बजेट कोसळू शकते.

Na Dho Mahanor । रानकवी ना.धों. महानोर कालवश! ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जरी आता टोमॅटोमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असले तरी त्यांनी पर्याय म्हणून भाजीसाठी केचपचा वापर केला जात आहे. टोमॅटोच्या तुलनेत केचपची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे अनेकजण आता १०० ते २०० रुपयांचं टोमॅटो खरेदी करण्याऐवजी केचपचा वापर करत आहेत.

Ajit Pawar । अजित पवार बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

Spread the love