Maharashtra Politics | ब्रेकिंग! आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

Uddhav Thackeray

Maharashtra Politics | शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर (Shiv Sena MLA disqualification case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी काल अंतिम निकाल जाहीर केला आहे. विधानसभा अध्यक्षांनी या निकालातून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! बड्या महिला मंत्र्याचे अजित पवारांवर सर्वात गंभीर आरोप; चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे यांचा पक्षच मूळ शिवसेना पक्ष असल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही (Mashal Symbol) त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने (Samata Party) पुन्हा दावा ठोकलाय.

Delhi Crime | आधी चाकूने वार केले, नंतर नाल्याजवळ ओढले… पोलिसांनी पाहताच मृतदेह टाकून ३ मुले पळाली; भयानक व्हिडिओ समोर

निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली असून आता समता पक्षही चिन्हासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळत आहे. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी सर्व अटी पूर्ण केल्याचा मोठा दावा देखील समता पक्षाने केला आहे. त्यामुळे आता मशाल चिन्ह ठाकरेंकडे राहणार की त्यांच्या हातातून निसटणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

Rohit Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! ‘हा’ बडा नेता दाखल करणार रोहित पवार यांच्याविरोधात गुन्हा

Spread the love