Earthquake । ब्रेकिंग न्यूज! दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के; पहा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Earthquake

Earthquake । गुरुवारी (11 जानेवारी) दुपारी अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये त्याची तीव्रता खूपच कमी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असून येथे त्याची तीव्रता 6.1 इतकी मोजण्यात आली. गुरुवारी दुपारी २.५० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

Maharashtra Politics | ब्रेकिंग! आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलच्या ईशान्येला २४१ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. पंखा थरथरत असल्याचे दिसून येते.

Ajit Pawar । ब्रेकिंग! बड्या महिला मंत्र्याचे अजित पवारांवर सर्वात गंभीर आरोप; चर्चांना उधाण

भूकंपाच्या वेळी काय करावे

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, भूकंपाच्या वेळी घाबरू नका, शांत राहा. टेबलाखाली जा आणि एका हाताने आपले डोके झाकून टाका. बाहेर पडल्यानंतर इमारती, झाडे आणि खांबांपासून दूर राहा. याशिवाय लिफ्टचा वापर करू नका. तुम्ही वाहनाच्या आत असाल तर ते थांबवा आणि थरथर थांबेपर्यंत आतच रहा.

Delhi Crime | आधी चाकूने वार केले, नंतर नाल्याजवळ ओढले… पोलिसांनी पाहताच मृतदेह टाकून ३ मुले पळाली; भयानक व्हिडिओ समोर

Spread the love