Bhushi Dam । पाच जण वाहून गेल्यावर भुशी डॅम परिसरात मोठी ऍक्शन

Bushi Dam

Bhushi Dam । पुण्यातील लोणावळा परिसरात रविवारी एक मोठी घटना घडली. लोणवळ्यातील डोंगरात वसलेल्या भुशी डॅमजवळ सहलीसाठी गेलो असताना अचानक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह वाढला. 10 जण वाहून गेले, त्यापैकी पाच जण वाचले. तर उर्वरित पाच जणांचे मृतदेह रविवारी आणि सोमवारी बाहेर काढण्यात आले.

Pune News । धबधब्यात उडी घेताच निवृत्त लष्करी जवान वाहून गेला; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

मृतांची ओळख

शाहिस्ता लियाकत अन्सारी (३६), अमिमा आदिल अन्सारी (१३), अदनान सबहत अन्सारी (४), मारिया अकील अन्सारी (९) आणि उमरा आदिल अन्सारी (८) अशी पोलिसांनी मृतांची नावे आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की शोध पथकाने रविवारी आणि सोमवारी जलाशयाच्या खालच्या प्रवाहातून या सर्व लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

Politics News । सर्वात मोठी बातमी! विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने 2 जागा जिंकल्या, कोकणात भाजपचा विजय

या घटनेमुळे प्रशासन अलर्ट झाले आहे. भुशी धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू झाली आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाकडून संयुक्त अतिक्रमण कारवाई सुरू आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उचललाय.

Mahindra XUV 700 शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ 3 SUV आहेत आश्चर्यकारक; जाणून घ्या भन्नाट फीचर्स

Spread the love