Loksabha Election । अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का! नरहरी झिरवळ करणार शरद पवार गटात प्रवेश

Sharad Pawar And Ajit Pawar

Loksabha Election । सध्या राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवार गटात असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आमदार नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. याबाबत संकेत देखील मिळालेले आहेत नरहरी झिरवळ हे सध्या शरद पवार गटाचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भास्कर भांगरे यांच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत.

Viral News । लग्न झाल्यानंतर नवरी बनली दरोडेखोर, लाखोंची रोकड आणि दागिने घेऊन ठोकली धूम

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर झिरवळ यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. मात्र लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून झिरवळ यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा प्रचारामध्ये सक्रिय असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

Arvind Kejriwal Bail । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

जर रहरी झिरवळ यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर अजितदादांसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे अशी लढत होणार आहे.

Maharashtra Politics । ब्रेकिंग! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा फायदा भाजपला होणार का? काँग्रेस नेत्याने केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

Spread the love