Arvind Kejriwal Bail । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांना अखेर जामीन मंजूर

Arvind Kejriwal Bail

Arvind Kejriwal Bail । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (10 मे) केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर आम्ही 1 जूनपर्यंत अंतरिम सुटका करणार आहोत, असे सांगितले. दरम्यान, केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी घेण्याची मागणी केली.

Maharashtra Politics । ब्रेकिंग! शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचा फायदा भाजपला होणार का? काँग्रेस नेत्याने केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

याबाबत सुप्रीम कोर्टाने सांगितले की, केजरीवाल यांच्या या याचिकेवरील वाद पुढील आठवड्यात संपवण्याचा प्रयत्न करू. सॉलिसिटर जनरल यांनी ईडीतर्फे हजर राहून न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाला अरविंद केजरीवाल यांना मुदत संपल्यानंतर आत्मसमर्पण करण्यास सांगण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना २ जूनला आत्मसमर्पण करावे लागेल. अंतरिम जामीन देताना न्यायालयाने अटींबाबत काहीही सांगितलेले नाही.

Pune Crime । पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत; हातात कोयते घेऊन विद्यार्थ्यांनी केला राडा; पाहा धक्कादायक व्हिडीओ

दिल्ली दारू धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती.

Narendra Dabholkar । ब्रेकिंग! नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पुणे न्यायालयाचा मोठा निर्णय, 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, 3 निर्दोष

Spread the love