Loksabha Election 2024। अजितदादांना ठाकरेंकडून धक्का! एकेकाळच्या विश्वासू शिलेदारालाच दिली लोकसभेची उमेदवारी

Uddhav Thackeray

Loksabha Election 2024 । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. राजकीय पक्ष आपला प्रचार अधिक तीव्र करत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी महाविकास आघाडी आघाडीत अनेक आघाड्यांवर एकमत झालेले नाही. विशेष म्हणजे शिवसेनेचे (यूबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये 17 जणांच्या नावाचा समावेश आहे.

Loksabha Election २०२४ । ठाकरे गटाकडून खैरेंना उमेदवारी जाहीर, दानवेंनी दिली पहिली प्रतिक्रया; म्हणाले, “मी नाराज…”

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला त्यामुळे मावळमधून उद्धव ठाकरे कोणत्या उमेदवाराची घोषणा करतील याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. आता उद्धव ठाकरे यांनी मावळ मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.

Prakash Ambedkar । सर्वात मोठी बातमी! जरांगे पाटलांसोबत प्रकाश आंबेडकरांची युती, जाहीर केली उमेदवारांची यादी

मावळमधून संजोग वाघेरे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संजोग वाघेरे ही पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर आहेत. त्याचबरोबर ते अजित पवार यांचे विश्वासू निकटवर्तीय म्हणून देखील ओळखले जायचे. मात्र त्यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार यांची साथ सोडत ठाकरे गटात प्रवेश केला होता. सध्या त्यांना देखील अपेक्षेप्रमाणे त्यांना ठाकरे गटाकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Crime News । लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीने केलं असं काही की सगळ्यांना बसला धक्का

Spread the love