Prakash Ambedkar । काल मध्यरात्री अचानक वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एक तासभर चर्चा झाली. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. भेटीदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. (Latest marathi news)
Crime News । लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीने केलं असं काही की सगळ्यांना बसला धक्का
अशातच आता राजकीय वर्तुळातून एक मोठी अपडेट समोर आली आहे. जरांगे पाटलांसोबत प्रकाश आंबेडकरांनी युती केली आहे. आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन आघाडीची घोषणा केली आहे. आंबेडकरांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीला खूप मोठा धक्का बसला आहे. वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली असून मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 एप्रिलनंतर निर्णय घेणार आहेत.
Satara Loksabha Election । अजितदादा बालेकिल्ला सोडणार? आज होणार महत्त्वाचा निर्णय
वंचितची पहिली उमेदवार यादी
अकोला : प्रकाश आंबेडकर
अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान
गडचिरोली : हितेश पांडुरंग मडावी
भंडारा-गोंदिया : संजय केवट
चंद्रपूर : राजेश बेले
वर्धा : प्रा. राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम : खेमसिंह पवार
बुलडाणा : वसंतराव मगर
Loksabha Election 2024 । महाविकास आघाडीला मोठा धक्का, हा बडा नेता लढवणार अपक्ष निवडणूक