Loksabha Election २०२४ । शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये 17 जणांच्या नावाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. दरम्यान आता ठाकरे गटाने उमेदवारी न दिल्यानंतर अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे?
याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “मी एक शिवसैनिक असून मला पक्षाचे हित कळतं. त्यामुळे माझ्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल तिला योग्य पद्धतीने पार पडण्याचं काम मी करणार आहे. जो उमेदवार दिला आहे त्याला मोठ्या मताधिकाने विजयी करा”. असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
Crime News । लग्नानंतर पहिल्याच दिवशी नवरीने केलं असं काही की सगळ्यांना बसला धक्का
त्याचबरोबर, पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ज्यावेळी उमेदवारांची यादी जाहीर झाली. त्यावेळी मी पक्षप्रमुखांना फोन केला. त्याचबरोबर मी नाराज नसल्याचे देखील त्यांना सांगितल आहे. मागच्या काही दिवसापासून अनेकजण शिवसेनेला सोडून गेले आहेत. या धक्क्यातून सावरत असताना पक्षाने मला जबाबदारी दिली. ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे. हे आपलं काम असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.
Satara Loksabha Election । अजितदादा बालेकिल्ला सोडणार? आज होणार महत्त्वाचा निर्णय