Buldhana News । भीषण अपघात! रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांवर काळाचा घाला, ४ जणांचा मृत्यू तर ६ गंभीर जखमी

Labourers sleeping on the roadside were attacked, 4 killed and 6 seriously injured

Buldhana News । बुलढाणा : वाहनचालकांच्या चुकीमुळे आज अनेक अपघात (Accident) होतात. या अपघातांमुळे अनेक जणांचे संसार उध्वस्त होतात. अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व येते तर काहींना आपले प्राण गमवावे लागते. असाच एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने (Truck Accident) चिरडले आहे. यात ४ जणांचा मृत्यू तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. (Accident News)

Jitendra Awhad । ‘घोडा लावला, हे शब्द…. ताई जरा जपून’; जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टवरून चर्चा

बुलढाण्यात आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली (Buldhana Accident News) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी या गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू असून त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मोरगड येथून काही कामगार आले होते. हे कामगार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या टीनशेडमध्ये झोपले होते. (Latest Marathi News)

Laser Light । गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचणे आले अंगलट, लेझर लाईटमुळे 6 जणांचा डोळा जाण्याची शक्यता

आज सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक भरधाव ट्रक टीनशेडमध्ये घुसला. या घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Desi Jugad । जुन्या वस्तूंपासून शेतकऱ्याने बनवला भन्नाट ट्रॅक्टर; १ लिटर डिझेलमध्ये १० गुंठे शेत नागंरणार

Spread the love