Site icon e लोकहित | Marathi News

Pune Koyata Gang । धक्कादायक! पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना, पोलिसांसमोरच केला हल्ला

Koyata gang attack in front of police in pune

Pune Koyata Gang । पुणे : मागील काही महिन्यांपासून पुणे शहरात कोयता गँगकडून (Koyata Gang in Pune) दहशत माजवण्याचे प्रकार सुरू आहेत. वर्चस्वाच्या वादातून गुंड प्रवृत्तीचे तरुण नागरिकांच्या वाहनांची बेधडक तोडफोड करत आहे. पोलिसांनी केलेल्या अनेक उपायांना ही गँग (Koyata Gang) पुरुन उरताना दिसत आहे. अशातच आता कोयता गँगचा धुमाकूळ पुन्हा सुरु झाला आहे. (Pune Crime News)

Petrol Diesel Rate । कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या

पुण्यातील वडगावशेरी परिसरात रात्रीच्या वेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एका गटाकडून दुसऱ्या गटावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. (Pune Crime) या हल्ल्यात दोन ते तीन तरूण गंभीर जखमी झाले असून पोलीस (Pune Police) स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Jaggery Tea । सावधान! तुम्हीही साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय का? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या

धक्कादायक बाब म्हणजे हल्ला झाला त्यावेळी महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होत्या. पोलिसांना न जुमनता कोयता गँगने हल्ला केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान,मागील काही दिवसांपासून पुण्यातील अनेक परिसरात रोज एक टोळ्या तयार होत आहेत. कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवली जात आहे. याला लगाम कधी लागणार? हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Accident | भीषण अपघात! डंपर आणि बसची जोरदार धडक, बसला लागली आग; 12 प्रवासी जिवंत जळाले

Spread the love
Exit mobile version