
Jayant Patil । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. आता या चर्चांना जयंत पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, “मी कालपासून मुंबईमध्ये आहे. मी पुण्याला येण्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे चालवत आहेत. त्यामुळे या बातम्यामुळे माझे देखील मनोरंजन झालं असल्याचं जयंत पाटलांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
Share Market । गुंतवणूकदारांनो, ‘या’ महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या
मी पुण्याला गेलो हे तुम्ही सांगताय त्याचबरोबर मी अमित शहा यांच्याबरोबर भेट देखील घेतली आणि अजित पवार गटात बरोबर देखील जाणार आहे. हे तुम्हाला कोणी सांगितलं? अशा राजकीय वर्तुळात चर्चा असतील तर जे चर्चा करतात त्यांना जाऊन विचारा माझ्यासारख्या गरीब माणसाला कशाला विचारता? मी कालही इथेच होतो आणि आज देखील इथेच राहणार आहे आणि उद्या देखील इथेच असेल त्यामुळे मला का विचारताय? असा संतप्त प्रश्न जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना केला.
मी अमित शहा यांची कधी भेट घेतली याचे देखील संशोधन तुम्हीच करा. बातम्या तुम्हीच तयार केल्या आहेत मी काय सांगितलं का? तुम्हाला मी काय याबाबत स्पष्टीकरण द्यायचं. रोज सकाळी उठून स्पष्टीकरण द्यायचा मी धंदा काढलेला आहे की काय? अशा शब्दांमध्ये जयंत पाटील यांनी प्रसाद माध्यमांना लक्ष केल आहे.