Israel Palestine । धक्कादायक! इस्रायली लष्कराने गाझामध्ये केले हवाई हल्ले, हमासने प्रत्युत्तर म्हणून रॉकेट…

Israel Palestine

Israel Palestine । इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघटना हमास यांच्यात 21 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. ‘टाइम्स ऑफ इस्रायल’च्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराने उत्तर गाझामध्ये रात्री उशिरा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. दरम्यान, इस्रायलने गाझा पट्टीत इंटरनेट बंद केल्याचे हमासने म्हटले आहे. हमासचा गाझाशी संपर्क तुटल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायलने दावा केला आहे की, हमास गाझा येथील रुग्णालयांतर्गत आपले मुख्यालय चालवत आहे. मात्र, हमासने हे दावे फेटाळून लावले आहेत. (Latest Marathi News)

Raigad News । धक्कादायक बातमी! शाळकरी मुलावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु

इस्रायलने पॅलेस्टिनी भूभागावर जोरदार बॉम्बफेक केल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून हे रॉकेट सोडल्याचे हमासने म्हटले आहे. हमासच्या सशस्त्र शाखा ‘इज्जेदिन अल-कसाम ब्रिगेड्स’ने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सांगितले की, “नागरिकांच्या कत्तलीला प्रत्युत्तर म्हणून इस्त्रायली-व्याप्त भागांना लक्ष्य करून रॉकेट हल्ले करण्यात आले. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

Maratha Reservation । मोठी बातमी! भाजप खासदाराच्या ताफ्यातील दोन गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या

अल जझीराच्या म्हणण्यानुसार, कतारच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम आणि कैदी स्वॅप करारावर बोलणी सुरू आहेत. मात्र, युद्धविराम होईपर्यंत ओलीस सोडले जाणार नसल्याचे हमासचे म्हणणे आहे.

Bjp । भाजपला धक्का! मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बड्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचा दिला इशारा

Spread the love