IPL 2024 । क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! लोकसभेमुळे बदलणार आयपीएलचे वेळापत्रक? समोर आली मोठी माहिती

IPL 2024

IPL 2024 । २२ मार्चपासून आयपीएलच्या (IPL) सतराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore) या संघात होणार आहे. कॉमेंट्री पॅनलमध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, हरभजन सिंग अशा अनेक दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. पण या आयपीएलवर टांगती तलवार आहे. कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) जाहीर केल्या आहेत. (Latest marathi news)

Maharashtra Politics । उगाच अजितदादांवर खापर फोडू नका, कौटुंबिक त्रासामुळे विजय शिवतारेंची किडनी फेल; बड्या नेत्याचा गंभीर इशारा

यंदाची आयपीएल ही 2 टप्पात खेळवली जाणार आहे, त्यातील पहिला टप्पा हा 7 एप्रिलपर्यंत खेळला जाणार आहे. तर आयपीएल 2024 चा दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये खेळवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान,आयपीएलचे सामने दुबईमध्ये हलवायचे की नाही याचा निर्णय बोर्ड घेणार आहेत. सध्या UAEमध्ये बीसीसीआयचे काही अधिकारी आहेत. काही संघांनी त्यांच्या खेळाडूंकडून पासपोर्ट मागितले अशी बातमी आहे.

Lok Sabha Elections । महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक, जाणून घ्या कोणत्या जागेवर कधी होणार मतदान?

दरम्यान, सार्वत्रिक निवडणुकांमुळे 2014 साली सुरूवातीचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आले होते. कोविडमुळे 2020 मध्येही आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतात न होता संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आला होता. आताही लोकसभा निवडणुकांमुळे हे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होण्याची शक्यता आहे.

Lok Sabha Election । सावधान! दोन वेळा मतदान केले तर… निवडणूक आयोगाने दिला गंभीर इशारा

Spread the love