Lok Sabha Election । सावधान! दोन वेळा मतदान केले तर… निवडणूक आयोगाने दिला गंभीर इशारा

Lok Sabha Election

Lok Sabha Election । सगळ्या देशाचं लक्ष असलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election Date) अखेर घोषणा झाली आहे. आज पत्रकार परिषद घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajeev Kumar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीत कशा प्रकारे तयारी केली जाईल याचीही माहिती यावेळी दिली आहे. (Latest marathi news)

Maharashtra Lok Sabha । ‘या’ तारखेला महाराष्ट्रात पार पडणार मतदान, जाणून घ्या सर्व माहिती

महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे आणि २५ मे या तारखांना मतदान पार पडेल. दरम्यान, निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी राजीव कुमार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. निवडणुकीदरम्यान दोन वेळा मतदान करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई केली जाणार आहे. निवडणुकीत कोणत्याही प्रकारे पैशाचा गैरवापर होऊ देणार नाही. तसेच मनी आणि मसल पॉवरला आगामी निवडणुकीत थारा राहणार नाही. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर आहे.

Lok Sabha Election । सर्वात मोठी बातमी! ‘या’ दिवशी पार पडणार लोकसभेच्या निवडणुका

Ads

देशात 97.8 कोटीपेक्षा जास्त मतदार असून यापैकी त्यामध्ये 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यावर्षी 82 लाख प्रौढ मतदार मतदान करतील तर 48 हजार तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Cabinet meeting । लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय, पहा यादी

Spread the love