Asia Cup 2023 । भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय! आठव्यांदा जिंकले विजेतेपद

India's resounding victory over Sri Lanka! Won the title for the eighth time

Asia Cup 2023 । आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम (Asia Cup 2023 Final) सामना आज भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झाला. दरम्यान, आज 30 ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता मिळाला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर पावसाचे सावट होते परंतु फायनलसाठी राखीव दिवस ठेवला होता. (Latest Sport News)

PM Modi Birthday । नरेंद्र मोदींची संपत्ती किती? कोणकोणत्या मार्गाने कमावतात पैसे? वाचा

टीम इंडियाने (India) श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत आठव्यांदा विजेतेपद जिंकले आहे. टीम इंडियाने सुपर 4 फेरीत श्रीलंकेला हरवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. या कामगिरीसह फायनलचे तिकिट मिळवणारा भारत हा पहिला संघ ठरला होता. भारताने श्रीलंकेचा 10 गडी राखून दारुण पराभव केला असून अंतिम सामन्यात विजयासाठी टीम इंडियासमोर केवळ 51 धावांचे लक्ष्य होते, जे टीम इंडियाने केवळ 6.1 षटकात पूर्ण केले.

Diamond League । ‘गोल्डन बॉय’ला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या काही सेंटीमीटरने हुकली संधी

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने 2.2 षटकात अवघ्या 3 धावा देत 3 बळी घेतले. बुमराहने एक विकेट घेत 5 षटकात 23 धावा दिल्या. त्यामुळे टीम इंडियाच्या आक्रमक गोलंदाजांपुढे श्रीलंकेचा निभाव लागला नाही. त्यांनी 15 केवळ 50 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाचा सहज विजय झाला. शुभमन गिलने नाबाद 27 आणि ईशानने नाबाद 23 रन केल्या.

Maratha reservation । मराठा समाजाला आरक्षण द्या! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Spread the love