Diamond League । भालाफेकपटू नीरज चोप्राची (Neeraj Chopra) भारताचा ‘गोल्डन बॉय’ म्हणून ओळख आहे. त्याने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. सोशल मीडियावर तो सतत सक्रिय असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. नीरज चोप्राला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण त्याचे अवघ्या काही सेंटीमीटरने जेतेपद हुकले आहे. त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागले आहे. (Diamond League 2023 Final)
Maratha reservation । मराठा समाजाला आरक्षण द्या! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
नीरज चोप्राला डायमंड लीगच्या अंतिम फेरीत (Diamond League Final) दुसरे स्थान मिळाले आहे. अमेरिकेतील ओरेगॉन येथे झालेल्या स्पर्धेत दुसऱ्या प्रयत्नात त्याने 83.80 मीटर भाला फेकला. तर या स्पर्धेत झेक प्रजासत्ताकचा जेकब वडलेच 84.24 मीटरचा सर्वोत्तम थ्रो करून पहिलं स्थान पटकावले आणि फिनलंडचा ऑलिव्हर हेलँडर 83.74 मीटरसह तिसरे स्थान पटकावले आहे.
Sambhaji Bhide । “… तर जेलमध्ये टाकून चक्की पिसायला लावू”; ‘या’ बड्या नेत्याचा संभाजी भिडेंना इशारा
जर त्याने हे विजेतेपद पटकावले असते, तर डायमंड लीग जिंकणारा तो तिसरा खेळाडू ठरला असता परंतु अवघ्या ०.४४ मीटरच्या फरकाने त्याचे जेतेपद हुकले आहे. मागील वर्षी याच महिन्यात झुरिच येथे डायमंड लीगची अंतिम फेरी जिंकण्यात नीरजला यश आले होते. मात्र आता त्याला डायमंड लीगच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी करता आली नाही.