नुकताच संपूर्ण देशाला हादरून टाकणारा दुर्दैवी रेल्वे अपघात ( train accident) ओडिशात घडला. तीन रेल्वे एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. अपघातामध्ये सुमारे २८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला. सुमारे १००० हून अधिक लोक या अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झाले. तीन रेल्वेंचा चक्काचूर झाला. रेल्वे इतिहासातील हा भयंकर स्वरूपाचा अपघात होता.
Sharad Pawar। शरद पवार धमकी प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा; समोर आली धक्कादायक माहिती
भारतीय रेल्वेचा ( Indian railway) मोठा इतिहास आहे. भारतात सर्वप्रथम १८५३ सली मुंबई ते ठाणे पहिली प्रवासी रेल्वे धावली. आज संपूर्ण भारतभर रेल्वेचे जाळे पसरले आहे. खेड्यापाड्यापर्यंत भारतीय रेल्वे पोहोचली आहे. सध्या जगात सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. देशभरात नियमित दररोज सुमारे १३ हजार ५०० हून अधिक रेल्वे गाड्या धावतात.
धक्कादायक! कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराने भावजयीला लाथाबुक्क्यानं मारल अन्…
प्रवासी रेल्वेच्या गाडीला जनरल स्लीपर, एसी असे कोच म्हणजेच बोगी असतात. या प्रत्येक डब्यांना बनवण्यासाठी वेगवेगळा खर्च येतो. एका मीडिया रिपोर्टनुसार, एक जनरल बोगी तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. स्लीपर बोगी तयार करण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च येतो तर , एक एसी बोगी तयार करण्यासाठी दोन कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.
लग्नाला काही तासच उरले होते मात्र नवरदेवासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का
रेल्वेच्या बोगीपेक्षा इंजिनची किंमत सर्वाधिक असते. एका रेल्वेच्या इंजिनची किंमत सुमारे १८ ते २० कोटी रुपये असते. जर एका रेल्वेमध्ये दोन जनरल, १० स्लीपर आणि आठ एसी बोगी असतील तर; त्या रेल्वेला बनवण्यासाठी ५० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. सध्या भारतात वंदे भारत एक्सप्रेस प्रगतीपथावर आहे. या रेल्वेला बनवण्यासाठी सुमारे ११० ते १२० कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो.
भारतातील ‘या’ गावात महिला कपडे न घालता राहतात; वाचा काय आहे नेमकं कारण?