एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मुलाखतीनंतरही होणार आणखी एक परीक्षा

MPSC

राज्यातील लाखो विद्यार्थी एमपीएससीचा (MPSC) अभ्यास करत असतात. यातील काही विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळते तर काहींना अपयशाला सामोरे जावे लागते. एमपीएससीची परीक्षा एकूण तीन टप्प्यात पार पडते, यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांचा समावेश असतो. अशातच आता याच विद्यार्थ्यांची (MPSC Candidates) काळजी वाढवणारी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता राज्य शासनाने (State Govt) एक मोठं निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

पशुपालकांनो.. तुम्हालाही स्वच्छ आणि निर्भळ दूध उत्पादन घ्यायचंय? तर मग ‘हे’ काम कराच

राज्य सेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना आता आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मुलाखतीनंतर उमेदवाराची वैद्यकीय चाचणी (Medical test) घेण्यात येणार आहे. त्यानुसार उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. त्याशिवाय मुलाखतीपूर्वी संबंधित उमेदवारांची वैद्यकीय चाचणी केल्यापासून ते नियुक्ती देण्याचा कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झाला तर शिफारसपात्र उमेदवारांची नियुक्तीपूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी घेतली जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

लग्नातच ऐनवेळी घडलं असं काही की, नववधूच्या पायाखालची जमीनच सरकली

समजा वैद्यकीय तपासणीनंतरच्या अहवालावर उमेदवाराला दाद मागायची असेल तर त्याला सात दिवसांचा कालावधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून मुंबईतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात अपिलीय वैद्यकीय मंडळाची स्थापना केली जाणार आहे. तो ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतो.

पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना बसणार मुसळधार पावसाचा तडाखा, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *